हैद्राबाद एन्काऊंटर ! जळगावात सामाजिक कार्यकर्त्यांसह विद्यार्थ्यांनीनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया

0

जळगाव : हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले.ते आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले होते. तरी ही त्यांनी पोलिसांच्याजवळ असणारे शास्त्र घेऊन पोलिसांवरच उगारल्याचा प्रयन्त केल्याने अखेर पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. याघटनेची माहिती शुक्रवारी सकाळपासून माध्यमांवर प्रसिध्द झाल्यामुळे सर्वीकडे जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोष साजरा करतांना अनेकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करतांना या घटनेचा स्वागत केले. तसेच काहींनी  यावेळी फटाके व पेढे वाटप करून हैदराबादचे अधिकाऱ्यांनी जे केले तसेच जलदगतीचे निर्णय दिल्लीतील निर्भया प्रकरण असो कि जळगावातील बालिका हत्याकांड प्रकरण, निर्णय असाच फास्ट घेतला पाहिजे. जेणेकरून कोणीही असं काही करण्याचा धाडस करणार नाही.

अत्याचारातील दोषींवर जे करण्यात आले ते खरच अभिमानास्पद आहे. तसेच आमच्या कडून इनकॉउंटर करणारे पोलिसांना प्रत्येकी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
– फारुख शेख, मानियार बिरादरीचे अध्यक्ष

शिक्षा देण्याचा अधिकार हे न्यायालयाला आहे, प्रत्येक बाबींसाठी काही प्रोसेस असते तसेच पोलिसांनी जे केले त्याचा सर्वीकडे स्वागत होत आहे परंतु पोलिसांनी जे केले त्यांच्यावर कायद्याने पाऊले उचली जाईल हे मात्र नक्की. पीडित कुटूंबाकडे कडून बघितला तर जे झाला ते योग्यच.
-केतन ढाके, सरकारी वकील

जळगावमध्ये ही अशीच घटना घडली होती त्यामध्ये बालिकेवर अत्याचार करून एका आदेश बाबाने हत्या केली होती. त्याघटनेला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकजुटता दाखवली. त्यानंतर त्याला मरेपर्यंत शिक्षा सुनावण्यात आली. तेव्हा व आता ही मनाला समाधान मिळाला.
-अरुण चांगरे, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस कामगार संघटनाचे अध्यक्ष

टॉवर चौकात आमच्याकडून फटाके फोडून जल्लोष करण्यात आले तसेच सर्व शासकीय कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना पेढे वाटून या निर्णयाचा स्वागत करण्यात आले. संविधानाचा दिवशी असं निकाल वंदनीय आहे.
-सरिता माळी, सामाजिक कार्यकर्ता

सकाळी कॉलेजला निघाल्यावेळी ही बातमी समजली तेव्हा मनाला खूप बरं वाटलं.असं निर्णय तिथली पोलिसांनी घेतली तसं सर्वीकडे घेतलाच पाहिजे. आम्ही दररोज बसने प्रवास करीत असतो लोकांचा  बघण्याचा दुर्ष्टीकोन चांगलं प्रकारे ठाऊक आहे. मुलांपेक्षा जे जेष्ठ असतात तेच घाण नजरेने बघतात.
-अर्चना सोनवणे, विद्यार्थी

भारतात असं घटनेत वाढ होत जात आहे.त्यावर काही तरी रोक लागलीच पाहिजे. सौदी अरबमध्ये असं काही केल्यावर भर चौकात मारलं जात .तसं इथे ही शिक्षा दिली पाहिजे.आज खरच कॊतुकास्पद केलं गेलं.
– भाग्यश्री धनगर,  विद्यार्थी

आजचा निर्णय चांगलंच आहे. पण मुलीने ही रात्री उशिरापर्यंत बाहेर कोणते ही कामासाठी जाणे टाळावे. तसेच मुलीनेही किंवा महिलांनी ही कुटूंबातील सदस्यांसोबतच जावे.जेणेकरून असं करण्याची कोणीच हिंम्मत होणार नाही.

– सि.आर.सपके, वकील महिला

Leave A Reply

Your email address will not be published.