पंतप्रधान मोदींकडे अडीच कोटीची मालमत्ता

0

नवी दिल्ली :– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यामध्ये गुजरातमधील गांधीनगरचे राहते घर,एक कोटी सत्तावीस लाख रुपयांची मुदत ठेव आणि केवळ ३८,७५० रुपयांची रोख रक्कम आहे, असा तपशील मोदी यांनी उमेदवारीअर्जासोबत निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे समोर आला आहे.

मोदींनी जशोदाबेन यांचे नाव पत्नी म्हणून लिहिले असून, स्वत: गुजरात विद्यापीठातून १९८३मध्ये एम.ए. झाल्याचे जाहीर केले आहे. मोदी १९६७ मध्ये गुजरात बोर्डातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी पदवी संपादित केली.मोदींच्या अचल संपत्तीमध्ये गांधीनगरमधील एका सदनिकेत 25 टक्के मालकी आहे. तर मोदींच्या हातात फक्त 38 हजार रुपये रोकड आहे. मोदींकडे १.४१ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता असून, १.१ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.  मोदींवर एकाही रुपयाचे कर्जनाही. सरकारकडून मिळणारा पगार आणि बॅंकेतून मिळणारे व्याज हे मोदींच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे.

पाच वर्षांतील वार्षिक उत्पन्न

2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये

2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये

2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये

2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये

2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये

Leave A Reply

Your email address will not be published.