नीरव मोदीच्या कोठडीत 24 मे पर्यंत वाढ

0

नवी दिल्ली :- पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटीचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटनमधील न्यायालयाने २४ मे पर्यंत कोठडी सुनावली असून त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. मोदी याने त्याला भारताच्या ताब्यात देऊ नये यासाठी याचिका दाखल केली असून त्याने तुरुंगातून व्हिडिओ जोडणीच्या माध्यमातून वेस्टमिनस्टर दंडाधिकारी तुरुंगात मुख्य दंडाधिकारी एम्मा अर्बुथनॉट यांच्यासमोर हजेरी लावली. ४८ वर्षांच्या मोदी याला गेल्या महिन्यात अटक केल्यानंतर लंडनमधील वँडस्वर्थ तुरुंगात ठेवले आहे.

नीरव मोदी तुम्हाला २४ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असून त्या वेळी आणखी सुनावणी घेतली जाईल व नंतर ३० मे रोजी तुम्हाला व्यक्तिगत पातळीवर हजर करून पूर्ण सुनावणी घेतली जाईल. नीरव मोदीला 20 मार्चला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला त्याच दिवशी लंडनमधील न्यायालयात हजर केले गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.