महाबळ कॉलनीतील मानस प्लाझा अपार्टमेंटला लागली आग

0

जळगाव :- शहरातील महाबळ कॉलनी चौकात असलेल्या मानस प्लाझा अपार्टमेंटमधील तीसर्‍या मजल्यावरील फ्लॅट नंबर 201 ला आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. सुदैवाने आगीची घटना वेळीच लक्षात आल्याने आगीला वेळीच विझवण्यात आले.

मानस प्लाझा अपार्टमेंटमधील फ्लॅट नंबर 201 मध्ये अॅड.सरोज लाठी हे आपल्या परिवारासह राहतात. चौकात असलेल्या विविध अपार्टमेंटमधील दुकानदार दुकाने उघडून ग्राहकांना सेवा पुरवित होते. दरम्यान प्लॅटची दारे खिडक्या बंद असल्याने खिडक्यांतून धुर निघु लागला. खिडक्यांतून निघत असलेल्या धुराकडे रस्त्याने जाणार्‍या व समोरील दुकानदार, रहीवाशी यांचे लक्ष गेले. त्यांनी लागलीच चौकातच राहत असलेले नगरसेवक नितीन बर्डे यांना याची माहिती दिली. नगरसेवक बर्डे यांनी तत्काळ अग्नीशमन दलाच्या कार्यालयात फोन करून बंब मागवून घेतले. त्यामुळे आग पसरण्याआधीच तिला विझवण्यात यश आले. दरम्यान, या आगीत महत्वाचे पुस्तके व सामान जाळून खाक झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.