पंकजा मुंडे आयसोलेट ;ट्वीट करून दिली माहिती

0

मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे आज मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी भाजपा नेत्या पंकजा मुंडे या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. प्रचारानंतर आता पंकजा मुंडे या स्वत: विलगीकरणात गेल्या आहेत. त्यांनी रात्री उशिरा यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली.

‘पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून आयसोलेट झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.