कार्तिकी पौर्णिमेनिमित्त उदळी येथे भाविकांनी घेतले कार्तिक स्वामींचे दर्शन

0

फैजपूर-  कार्तिकी पौर्णिमेनिमित्त रावेर तालुक्यातील उदळी येथील जागृत देवस्थान कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी सोशल डिस्टंसींग व सर्व नियम पाळून दर्शन घेतले.वर्षभरात फक्त एकदाच भाविकांसाठी कार्तिक स्वामींचे मंदिर खुले करण्यात येते.व हा दर्शन योग देखील भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.यावर्षी कोरोना महामारीचे संकट असल्याने गेले अनेक महिने सर्व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती.पण दिवाळी नंतर नियम व अटी लागू करत शासनाने पुन्हा सर्व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केल्याने वर्षातुन एकदाच कार्तिक स्वामींचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी यावर्षीही भाविकांना मिळाली.सोशल डिस्टंसींग, मास्क व सर्व नियम पाळून शेकडो भविकांनी आज याठिकाणी कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.