न्याय्य मागण्यासांठी जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे लाक्षणिक उपोषण

0

जळगांव.दि.2-
राज्य माध्यमिक शिक्षक संघातर्फे 16 डिसेंबर नगर तसेच पुणे येथे 13 जानेवारी 2019 रोजी झालेल्या सभेत चर्चा करण्यात आली होती. त्यात माध्यमिक शिक्षक संघातर्फे विविध प्रलंबित न्याय्य मागण्या मांडण्यात आल्या होत्या. त्यानुसार आज जुन्या जिल्हा परीषद भवनासमोर एक धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी संघटनाध्यक्ष एच जी इंगळे, एस.डी.भिरूड यांचेसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सातव्या वेतन आयोगाची तातडीने अंमलबजावणी, 20 टक्के अनुदान पात्र शाळा तुकडया वगार्ंंना टप्पा अनुदान विनाअट मंजुरी,निकषपात्र विनाअनुदानीत शाळा वर्गखोल्यांना सरसकट अनुदान मंजुरी, अतिरिक्त शिक्षकांचे जिल्ह्यांतर्गत समायोजन, समायोजन न झालेल्या शिक्षकांचे वेतन नियमित अदा करणे, शालार्थ ची प्रकरणे, सर्व प्रशिक्षणांना टीएडीए दहावी ,बारावी बोर्ड उत्तरपत्रिका तपासणीसह अन्य कामे करणार्‍या घटकांच्या मानधनात वाढ करणे, प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांना हायस्कूल शिक्षकाची वेतनश्रेणी मंजूरी, मनपा, नपा, नगरपंचायत , क्षेत्रातील शिक्षण संस्था, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा इमारतीवरील कर माफी शाळांची विज बिल आकारणी घरगुती दराने करावी आदि मागण्यासाठी जिल्हा परीषद कार्यालयासमोर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघातर्फे लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.