जि.प. आरोग्य सभापती पाटील यांना टवाळखोरांकडून धक्काबुक्की

0

बांबुने मारहाण करून खिशातील पैसे लांबवण्याचा प्रयत्न, एक संशयित ताब्यात

जळगांव, दि.3.-
रेल्वे स्थानकाच्या पश्मिम बाजूस शिवाजीनगर गेंदालाल मील परीसरात शनिवार सायंकाळी मद्यप्राशन केलेल्या काही टवाळ टारगट तरूणांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील यांचे शासकिय वाहन अडवून त्यांच्याशी घातल्याची घटना घडली.या परीसरात रेल्वे हद्दीतुन जाणार्‍या येणार्‍या प्रवाश्यांच्या हातातील मौल्यवान किमती मोबाईल वा अन्य वस्तु लंपास केल्याच्या घटना नेहमीच घडत असल्याने परीसरात नेहमीच दहशतीचे वातावरण असून रेल्वे स्थानक व स्थानिक प्रशासन पोलीसांचे या गुन्हेगांरांशी सलोख्याचे संबंध आहेत असे बोलले जात आहे.
जिल्हा परिषदेतील कामकाज आटोपल्यानंतर आरोग्य सभापती दिलीप व त्यांचे भाऊ चंद्रशेखर पाटील हे शासकिय वाहनाने निवृत्ती नगर येथे रहात असलेल्या बहिणीकडे जात असताना गेंदालाल मीलमध्ये रस्त्यावर काही टवाळखोर हुज्जत घालत होते. पाटील यांचे वाहन तेथे हळू झाले असता त्यातील दोन जणांनी वाहनाशी छेडछाड केली. हा प्रकार पाहिल्यानंतर दिलीप पाटील वाहनाच्या खाली उतरले असता टवाळखोर त्यांच्या अंगावर गेले तर एका जणाने गर्दीत चंद्रशेखर पाटील यांच्या खिशात हात टाकून पैसे लांबविण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पाटील यांनी शहर पोलिसांशी संपर्क करुन घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याचे संभाव्य घटना टळली. धुडगूस घालणारे काही जण पळून गेले तर जुबेर नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही. निरीक्षक एकनाथ पाडळे, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, अमोल पाटील, संजय शेलार आदी कर्मचार्‍यांनी एका जणाला पकडण्यात आले असल्याचे सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.