नोबेल फाउंडेशनतर्फे दुष्काळी भागातील ५० विद्यार्थ्यांना मोफत भोजन

0

जळगाव : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी, फार्मसी तसेच कृषी पदवीसाठी यावर्षी 2 ते 13 मे दरम्यान ऑनलाइन एमएचटी- सीईटी प्रवेश परीक्षा होत असून, त्यासाठी उन्हाळी मार्गदर्शन वर्ग ७ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान होत आहे. नोबेल फाउंडेशनतर्फे मार्गदर्शन वर्ग आयोजित केले असून दुष्काळी गावांतील ५० विद्यार्थ्यांची या प्रशिक्षण वर्गाच्या काळात मोफत भोजन व्यवस्थेचे आयोजन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.

यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागातील ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षणकाळात विनामूल्य भोजन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या योजनेसाठी दात्यांनी किमान एक मुलगा दीड महिन्यासाठी दत्तक घ्यावा, असे आवाहन फाउंडेशनने केले आहे. या योजनेच्या लाभासाठी 5 ते 9 मार्चदरम्यान मुलाखती होणार असून, इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांनी नोबेल फाउंडेशन, ख्वाजामियॉं दर्ग्यासमोर, गणेश कॉलनी रोड येथे त्यासाठी संपर्क साधावा. तसेच “सीईटी’ची पुस्तके महाग असतात. पालकांना पुस्तके खरेदी करण्याची आवश्‍यकता नसून विद्यार्थ्यांना “सीईटी’च्या संदर्भ पुस्तकांचे ग्रंथालय २४ तास अभ्यासासाठी विनामूल्य दिले जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.