शहिदांच्या कुटुंबीयांना 110 कोटी द्यायचे आहे ; दृष्टीहीन मुर्तजा ए हामिद यांची इच्छा

0

कोटा – पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले. राजस्थानच्या कोटाचे रहिवासी असलेले मुर्तजा ए हामिद यांनी देखील मदतीसाठी पुढाकार घेतला असून तब्बल 110 कोटी शहिदांना दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पंतप्रधान कार्यालयाला त्यांनी याबाबत ई-मेल पाठवला असून करपात्र उत्पन्नातून 110 कोटी रुपये पंतप्रधान साहाय्यता निधिमध्ये जमा करण्याचे त्यांनी ठरवले आहे.

४४ वर्षांचे मुर्तजा हे जन्मापासून दृष्टीहीन असून मुंबईत ते संशोधक आणि शास्त्रज्ञ म्हणून काम करतात. शहिदांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला एक ई-मेल पाठवला आहे. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत करण्याची भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी, असे मत हमीद यांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.