पाचोरा येथे शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ

0

पाचोरा :- येथे आज भडगाव शेतकी संघाचा (आडत दुकान) शासकीय तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ संघाचे चेअरमन प्रताप हरी पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतिष शिंदे होते.

यावेळी वलवाडी येथील शेतकरी राजेंद्र संतोष पाटील यांची तूर खरेदी करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक गंगाराम पाटील, राजू पाटील, मार्केट कमेटीचे संचालक अॅड. दिनकर देवरे उपस्थित होत. प्रारंभी आलेल्या मान्यवरांचे स्वागत प्रताप पाटील तथा व्हाईस चेअरमन सुपडू पाटील, संघाचे संचालक जयवंत पाटील यांनी केले. शासनाने ५ हजार ६७५ रु. हमी भाव जाहीर केला असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रताप पाटील यांनी केले. शेतकी संघाचे मॅनेजर अवधूत देशमुख, रमेश पाटील, युवराज पाटील, देवलाल भोई यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.