शहीद जवानच्या कुटुंबियांना निंभोरा ग्रामस्थांची आर्थिक मदत

0

निंभोरा :- येथील शिवजयंती उत्सव समिती व निंभोरा ग्रामस्थ, लहान मोठे व्यापारी, सहकारी संस्था या सर्वांच्यावतीने बुलढाणा येथील मूळ रहिवासी असलेले शहीद जवान संजयसिंग राजपूत यांच्या कुटुंबियांना “शहीद निधी” तून आर्थिक मदत करण्यात आली. १ लाख ११ हजार १११ रुपयांची रोख रक्कम त्यांच्या मलकापूर येथील राहत्या घरी जाऊन देण्यात आली.

यावेळी निंभोरा येथील सरपंच डिगंबर चौधरी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कडू चौधरी, मलकापूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक सी जी राजपूत, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नितीन पाटील, राजीव बोरसे, भूषण चौधरी, वाय डी पाटील, प्रा.दिलीप सोनवणे, श्रीराम पाटील यांसह स्थानिक पत्रकार व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शहीद स्व.संजय राजपूत यांच्या पत्नी, त्यांची दोन मुलं व त्यांचे बंधू यांच्याकडे सदर रक्कम सुपूर्द करण्यात आली. स्व.शहीद संजय राजपूत यांच्या घराजवळच खुल्या भूखंडावर त्यांचे स्मारक बनविण्यात येणार असून त्या जागेलाही भेट देत निंभोरा ग्रामस्थांनी नमन केले.

यावेळी सावदा येथील स्वामीनारायण नगर मधिल रहिवासी व माजी सैनिक पि.के.चौधरी व यांनी संकलीत केलेला ३५०० रूपयाचा शहिद मदत निधि प्रा.दिलीप सोनवणे यांनी शहिद कुटूंबास सुपुर्द केला.

Leave A Reply

Your email address will not be published.