आ.खडसे यांच्याहस्ते भाविकांना फराळाचे वाटप

0

मुक्ताईनगर :- येथे महाशिवरात्रीनिमित्त आदिशक्ती मुक्ताईच्या आणि चांगदेवाच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरू, भाविकांना फराळाचे वाटप माजी महसुल कृषी मंत्री आ एकनाथरावजी खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खामगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील, जि.प.सदस्य निलेशभाऊ पाटील, माजी सभापती राजू भाऊ माळी, नगरसेवक पियुषभाऊ महाजन, ललितभाऊ महाजन, संतोषजी कोळी, निलेशभाऊ शिरसाट डॉ प्रदिपजी पाटील विनोदजी गवळे, सुनिलभाऊ काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

गोदावरीनगरमधील दत्तेश्वर मंदिरात फराळ वाटप
गोदावरीनगरमध्ये दत्तेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांकडून भाविकांना फराळ वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, महेंद्र मालवेकर, डॉ.विवेक तायडे, संजय वाडीले, डॉ.प्रा. नेहते सर, छगन मोरस्कर, शिवा पाटील, श्यामकांत रुले, महेंद्र तायडे, निलेश मालवेकर, संदीप इंगळे, प्रवीण बडगुजर, वैशाली वाडीले, शकुंतला मालवेकर, मीना पाटील व परिसरातील सर्व नागरिकांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.