नुरुद्दीन मुल्लाजी यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने सन्मान

0

कासोदा ता ,एरंडोल( प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार नुरुद्दीन मुल्लाजी यांना औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशन तथा ग्रंथमित्र युवा मंडळ च्या वतीने आयोजित केलेल्या शब्दगंध समूह प्रकाशन व विविध क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात नुरुद्दिन मुल्लाजी यांना डॉ ,बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षपद उद्घाटन व पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्याच्या त्यांना बहुमान मिळाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप भदाणे यांनी केले तर प्रस्ताविक कार्यक्रमाचे आयोजक संदीप त्रिभुवन यांनी केले.
याप्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राष्ट्रीय पुरस्कार महात्मा फुले आदर्श शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय पुरस्कार मान्यवरांना देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले जळगाव जिल्ह्यातील यावल येथील शेख जावेद सर, धरणगाव येथील शेख ऐनुद्दीन सर, आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन कल्याणचे जितेंद्र केवलसिंग पाटील धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील शेख असिफ खाटीक सर यांचा समावेश होता.
नुरुद्दीन मुल्लाजी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की मला आज पर्यंत 24 पुरस्कार मिळाले आहे त्यात एपीजे अब्दुल कलाम महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभ भाई पटेल अहिल्यादेवी होळकर महाराष्ट्र गौरव पुरस्कार व उत्कृष्ट समाजसेवक बेस्ट सोशल वर्कर उत्कृष्ट पत्रकार असे पुरस्कार मिळाले आहे . परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने पुरस्कार मिळावा अशी माझी इच्छा होती ती आज 25 व्या पुरस्कार मिळाल्याने माजी इच्छापूर्ती झाली असल्याचे त्यांनी सांगितले हा सन्मान संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या सन्मान असल्याचाही त्यांनी आवर्जून सांगितले.
कार्यक्रमाला अनेक मान्यवर शिक्षक वृंद उपस्थित होते आभार प्रदर्शन संगीता दाभाडे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.