नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीस सरकार बांधील

0

आठ दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्यातील पुरामुळे नुकसान झाले. त्या शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या पिकांचे नुकसानीची पाहणी पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी केली. आज जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली दोन्ही ठिकाणी पालकमंत्र्यांच्या समवेत माजी पालकमंत्री आ.गिरीश महाजन होते हे विशेष. दोन्ही वेळेस पालकमंत्री मुंबईहून मंत्रीमंडळाची बैठक आटोपून आले होते. मुंबईमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेवून कोकणच्या धरर्तीवर जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना मदत मिळावी अशी मागणी केली आणि त्याला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना सरकारी मदत मिळेल. ही आशा आहे. आजच्या जामनेर तालुक्यातील एक शेतकरी आणि त्यांची पत्नी पालकमंत्र्यांसमोर धावमोकळून रडत होते. जेवढे होते नव्हते ते सगळे शेतीला लावून केळीचे चार फड तयार केले होते. संपूर्ण केळीचे पिक दृश्य लागावे असे वाटलेले होते. केळीची कापण आता काही दिवसांवर आली विम्याच्या संदर्भात तक्रारीचा सूर होता. पिकविम्यापासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळाले पाहिजे परंतु येथे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यावर विम्याचे संरक्षणच मिळत नाही अशा प्रकारे जवळ जवळ सर्वच शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकविम्याचा एकदाचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे. इथे नुकसानग्रस्तांना विम्याचे सरंक्षण मिळण्याऐवजी विमा कंपन्यांनी करोडो रुपयांची कमाई करतात हे कसे? यासंदर्भात शासनातर्फे खुलासा करण्यात आला की अशा गुन्हे दाखल करण्यात आले असून दुसऱ्या कंपन्यांच्या शोधात आपण आहोत. आजमितीला शेतकऱ्यांना हक्काचे विमा संरक्षण मिळत नाही याची पालकमंत्र्यांनी घ्यावी आणि शासनाला तसे कळवावे म्हणजे नुकसानग्रसत शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ येणार नाही.

जळगाव जिल्हयात झालेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर तातडीने पालकमंत्री गुलाबराव पाटील घटनास्थळी पोहोचतात. ही एम समाधानाची बाब म्हणता येईल. परंतु प्रत्यक्ष गेल्यानंतर पालकमंत्र्यांकडून तातडीने नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य मिळावे ही अपेक्षा. जळगाव जिल्हयात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे समवेत विरोधी पक्ष भाजपचे नेते आ.गिरीश महाजन हे खुद्द असल्यामुळे विरोधकांची सत्ताधारी पक्षावर अथवा पालकमंत्र्यांवर होणारी टिकेची धार कमी होतेय. हे मात्र सत्य आहे. अनुभवाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची विचार करण्याची परिपक्वता दिसून येत आहे. मूळ शिवसेनेचे रक्त असलेले गुलाबराव पाटील बऱ्याच वेळा त्यांच्यातल्या शिवसैनिकाला जागे होवू देत नाहीत. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे देता येईल. बँकेची निवडणूक झालीच तर महाविकास आघाडीचे पॅनल सहजपणे निवडूण येऊ शकते अशी परिस्थिती असतांना सुध्दा सहकार क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या बँकेच्या निवडनुकीत कोट्यावधीचा चुरडा करणे अहिताचे असल्याने शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्ष राजकीय पक्षांनी आपले राजकीय जोडे बाहेर काढून एकत्र येण्याचा जो निर्णय घेतला गेला तो अभिनंदनीय आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना अनुभवी नेते राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे यांचे मार्गदर्शन लाभते आहे ही बाब महत्वाचे म्हणता येईल. डबघाईस आलेली जिल्हा बँक आता कुठे नफ्यात आलेली असतांना निवडणुवर पैशांचा चुराडा करणे परवडणारे नाही. पालकमंत्री गुलाबराव पाटलांना एक सुचवावेसे वाटते ते म्हणजे जिल्ह्यातील प्रलंबित विकासांच्या प्रकल्पाला चालना कसे मिळेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत. त्याचबरोबर शासकीय जरब बसविण्याची गरज आहे.

उदाहरणच द्यायच झाले तर जळगाव महानगरपालिका प्रशासनाचे देता येईल. प्रशाससनाच्या बेफिकीरीमुळे जळगाव शहराची वाट लागली आहे. शहर विद्रुपी करणास हे प्रशासकीय अधिकारीच जबाबदार आहे. त्यांचेकडून कार्यक्षमपणे कामे होत नसतील तर त्यांची उचलबांगडी करा तरच जळगाव मनपाच्या कारभारात गतीमानता येईल. अन्यथा येरे माझ्या मागल्या चालू राहील यात शंका नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.