नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक: मोदींनी केले अभिनंदन

0

टोकियो

टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले.

नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून कौतुक होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील निरजला शाबासकी दिली.

टोकियोमध्ये आज इतिहास घडला आहे. नीरज चोप्राने जे साध्य केले ते कायम स्मरणात राहील. नीरजने अपवादात्मक कामगिरी केली आहे. तो उल्लेखनीय खेळला आणि नीरज अतुलनीय संयम दाखवला. सुवर्ण जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

अशाप्रकारे भारताच्या खात्यात आत्तापर्यंत 7 पदके जमा झाली असून त्यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्यपदकाचा समावेश आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.