कुपोषित आदिवासी बालकाच्या मृत्युप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी- मनसेतर्फे निवेदन

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

तालुक्यातील सातपुडयाच्या पायथ्याशी असलेल्या वड्री धरण परिसरातील आदिवासी बालकाचा कुपोषणाने मृत्यु झाला यावल तालुक्याच्या आदिवासी भागात अनेक कुपोषित बालके आहे. परंतु त्यांच्यापर्यंत शासकीय योजना पोहचत नसुन त्यांना त्या पोहोचण्याचे काम यावल आदिवासी विभाग, पंचायत समिती यांची ती जबाबदारी होती,  त्यांनी ती योग्यरित्या पाळली नसून त्या अधिकाऱ्यांवर बालकाच्या मृत्युने संपूर्ण जिल्हा हादरला असून तालुक्यात कुपोषणग्रस्त पुर्न.सर्वेक्षण झाल्यास अनेक धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता आहे.

सदर घटना अतिशय दुखत असून आदिवासी एकात्मिक प्रकल्प विभाग, जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास विभाग कार्यालय व आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून तालुक्यातील आदिवासी बांधवासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या कोटयावधी रूपयांच्या योजनांचा बटयाबोल भ्रष्टाचार झाला आहे.

तरी या सर्व विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा त्या अधिकाऱ्यांचा समाचार मनसे स्टाईल घेण्यात येईल,  असे मनसेचे रावेर लोकसभा जिल्हा अध्यक्ष जनहीत चेतन अढळकर यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी.कार्यकर्ते किशोर नंनवरे, गौरव कोळी, आकाश चोपडे, विपुल येवलले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.