निवडणुकीसाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी ट्विटरवरील नावात केला बदल

0

नवीदिल्ली –
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरील नावात बदल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटचे ‘चौकीदार नरेंद्र मोदी’ असे नवीन नाव तर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी देखील ‘चौकीदार अमित शाह’ असे नाव ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याशिवाय भाजपाच्या सर्वच नेत्यांनी ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार लावले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपामधील चौकीदारचा वाद प्रचारादरम्यान चांगलाच गाजण्याची शक्याता आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौकीदार चोर है’, या राहुल गांधी यांच्या घोषणेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं ‘मै भी चौकीदार’ म्हणत एक व्हिडीओ नुकताच तयार केला होता. आता मोदी आणि अमित शाह यांनी आपल्या नावात बदल केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राहुल गांधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागत आहेत. चौकीदार चौर है या राहुल गांधी यांच्या टिकेला भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.