नागरिकांना सहनशीलता प्रमाणपत्र वाटून राष्ट्रवादीतर्फे गांधीगिरी !

0

जळगाव ;- काही वर्षापासून रस्ते,अस्वच्छता, धुळ,अतिक्रमण,बेशिस्त पार्कीग, हॉकर्स ची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

म.न.पा.सत्ताधारी, प्रशासनाकडून किंवा पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातुन ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्यापैकी कोणतीही सुविधा व्यवस्थीत मिळू शकत नाही, त्यामुळे जळगावकर सहनशील झाल्याने त्यांना राष्ट्रवादीतर्फे सहनशीलता प्रमाणपत्र आज वाटण्यात येऊन अनोख्या रीतीने गांधीगिरी करण्यात आली .

यात राष्ट्रवादीने म्हटले आहे कि ,जळगांव करांना गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी/ म.न.पा.प्रशासनाकडून किंवापदाधिकारांच्या माध्यमातून ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या पैकी कोणतीही सुविधा व्यवस्थित मिळू शकत नाही. काही वर्षापासून रस्ते ,अस्वच्छता, धुळ,अतिक्रमण,बेशिस्त पाकींग,हॉकर्स ह्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय गंभीर झालेली आहे. अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्या योजेमुळे रस्ते खोदले जात आहे. त्यामुळे नविन रस्ते करणे शक्य नाही. परंतू रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे काम मनपा कडून होतांना दिसून येत नाही. त्यामुळे जळगांवकर गेल्या 2 वर्षापासून खराब रस्त्यावरूनच दररोज मार्गक्रमण करीत आहेत. पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती अतिशय भयंकर होते. मनपा ने शहरातील दैनंदिन साफ सफाईसाठी 75 कोटींची निविदा काढून वॉटर ग्रेस कंपनीला मक्ता दिला आहे. मक्ता देऊन 6 महिन्यांचा काळ झाला आहे.

मात्र 6 महिन्यात स्वच्छतेचा प्रश्न मार्गी न लागता तो वाढतच जात आहे.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, घंटा गाड्यांचे शुन्य नियोजन यामुळे 75 कोटींचा मक्ता सपशेल अपयशी ठरतांना दिसत आहे. मनपा प्रशासनाला मक्तेदाराला शिस्त लावण्यात पुर्णपणे अपयश आले आहे. मक्तेदाराला प्रशासनाकडून आतापर्यंत 4 नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. मात्र म.न.पा.कडून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेले नाही. प्रत्येक महासभेत प्रश्न येतात वाद होतात मात्र प्रत्यक्ष नियोजन होतांना दिसून येत नाही. डिसेंबर 2018 मध्ये एस्को तत्वावर 15 हजार एल.ई.डी.बसविण्याचा 7.5 कोटी रूपयांचा मक्ता ई ई ई एस एल कंपनीला देण्यात आला.कंपनीचे मार्च 2019 पर्यंत हे काम करणे गरजेचे होते. केवळ 7 हजार एल.ई.डी बसविणेत आले. त्यातही 2 हजाराहून अधिक एल.ई.डी काही दिवसातच खराब झाले. मुख्य रस्त्यासह उपनगरांमध्ये अंधराचे साम्राज्य पसरले आहे.महासभेत गोंधळ झाला. लक्षवेधी मांडल्या गेल्या समस्या मात्र सुटली नाही.

मार्च महिन्यापर्यंत कंपनीने एल.ई.डी.बसविणेचे काम पुर्ण केले नाही.त्यामुळे हा मक्ता रद्द करण्याची तयारी महासभेने केली.मात्र कायद्यातील अडचणींमुळे प्रशासनाने मक्ता रद्द होऊ दिला नाही. नविन डी.पी.आर. तयार करून नव्याने काम सुरू करण्याचे सुचना दिल्या. सुचना देऊन आता 6 महिने झाले. डी.पी.आर. तयार नाही जळगांवर मात्र अंधरातच आहेत. शहरातील 21 मार्केट मधील 2800 हून अधिक गाळे धारकांची कराराची मुदत संपलेली आहे. मात्र अजुनही या गाळेधारकांना न्याय मिळू शकला नाही. दोन मार्केट वगळता इतर

मार्केट मधील गाळे धारकांना 100 कोटींची वसुली बाकी. म.न.पा.चे ही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे मनपा ला नागरीकांना सुविधा देण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

गाळ्यांचे नव्याने मुल्यांकन करून भाड्याची रक्कम काही प्रमाणात कमी करण्यात आली. आतापर्यंत 80 कोटी रूपयांची वसुली झालेली आहे.केवळ 2 मार्केट मधील गाळे धारकांचा समावेश आहे. 16 मार्केट मधील गाळेधारकांकडून वसुली झाली नाही. 14 अव्यवसायी

मार्केट मधील गाळे धारकांचा तोडगा निघू शकलेला नाही. शहरभर अतिक्रमणाची समस्या निर्माण झालेली आहे. मुख्य बाजारपेठ असो वा उपनगरांमधील चौकांचे परिसर सर्वचच ठिकाणी अनाधिकृत हॉकर्स बांधकामाचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे दररोज मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. हॉकर्स बाबत कोणतेही नियोजन नाही. किंवा त्यांना शिस्त लावण्याबाबतही पदाधिकारीही गंभीर ही नाहीत.

म.न.पा.ने शहरातील हॉकर्सला काही जागा निश्चीत केल्या आहेत. त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याचे सुचना दिल्या आहेत. मात्र हॉकर्स कडून ज्याठीकाणी बंदी आहे त्याच ठिकाणी घुसखोरी सुरू झाली आहे. म.न.पा.ने टाईमझोन निश्चित करण्याचे ठरविले होते. मात्र याबाबत चर्चा सुरू असून अंमलबजावणी मात्र होतांना दिसून येत नाही.आदी विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याने त्यांच्याकडून हे आंदोलन करण्यात आले . यावेळी शंभु रोकडे, स्वप्निल नेमाडे, प्रशांत राजपुत, रोहन सोनवणे, गणेश निंबाळकर, मजहर पठाण, तुषार इंगळे, अनिरुद्ध जाधव, सलीम ईनामदार, अ. गफ्फार मलीक आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.