नवयुवक मित्र परीवारच्या वतीने रक्तदान शिविर संपन्न ; 65 रक्तदात्यांनी केले रक्तदान

0

अमरावती (प्रतिनिधी) :  अमरावती जिल्हा संघटना व जिल्हा सचिव प्रमोद राठी नवयुवक मित्र परिवार यांच्या वतिने . अमरावति जिल्ह्यात  कोरोणा बाधित रुग्णांची वाढती  संख्या लक्षात घेवुन  रविवार 2 मे रोजी  बडनेरा रोड स्थित  टू  वेल च्या बाजू ला गोविंदा आपारमेंट मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये युवकांनी उत्तम प्रतिसाद देत  शेकडो युवक  रक्तदान करण्यासाठी आले होते .

राज्यात 18 वर्षाच्या वरील तरुणांकरीता 1 मे पासून कोरोना प्रतिबंधक लस  देने सुरू झाले आहे. परंतु ही लस घेण्या अगोदर युवकांना   रक्तदान करता येते लस घेतल्यानंतर मात्र  एक ते दीड महिन्यापर्यंत रक्तदान करणे चालत नाही. त्याकरिता प्रमोद राठी व नवयुवक मित्र परिवार यांच्याकडून रविवारी दोन मे रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये 111 रक्तदात्यांनी  रक्तदान करण्याचे लक्ष होते. परंतु  इरविन हॉस्पिटलच्या  ब्लड बँकेच्या टीम जवळ रक्तदान संकलित करण्याच्या  पिशव्या कमी पडल्यामुळे  रक्तदान करण्याकरिता आलेले  बरेचसे युवक आल्या पावली परत गेले.

या शिबिरामध्ये एकूण 65 युवकांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले .शिबिरामध्ये जिल्हा संघटनेचे  सचिव प्रमोद राठी, जिल्हा कार्य समिती सदर अमित मंत्री, प्रमोद राठी, जिल्हा संघटक संजय भूतडा,उत्तर प्रभाग अध्यक्ष सिताराम राठी, महेश सेवा संघ अध्यक्ष राम प्रकाश गिल्डा, मोहित सारडा, अभिजीत राठी, विश्वजीत लड्डा,दीपेश राठी, डॉ.अदिती राठी,चित्रा सारडा,डॉ.श्रुती लड्डा, संकेत मुंधडा, आशिष सोमानी आदि उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.