धुळे हादरलं! 22 वर्षीय तरुणीचा कोरोनामुळे मृत्यू

0

धुळे : महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. खान्देशमध्येही कोरोनाने हातपाय पसरवले आहे. धुळ्यात गेल्या 24 तासांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, आज एका 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

धुळे जिल्ह्यात शुक्रवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दोघांपैकी पैकी एका 53 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला होता. तर 22 वर्षीय तरुणीवर उपचार सुरू होते. परंतु, आज उपचारादरम्यान, या तरुणीचाही मृत्यू ओढावला. जिल्ह्यातही कोरोनाने शिरकाव केला असून साक्री येथील 53 वर्षीय प्रोढाचा मृत्यू कोरोनाविषाणुमुळे झाल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाला धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलेले होते. तिथे शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांना क्षयरोगही होता. हा धुळे जिल्ह्यातील पहिला कोरोना बळी होता.

याशिवाय विलगीकरण कक्षात दाखल मालेगाव येथील 22 वर्षीय तरुणीचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला होता. तिच्यावर उपचार सुरू होते. ही तरुणी मालेगाव येथून धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. आज, पहाटे तिचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बळीचा आकडा हा दोनवर पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.