धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी इसमाचा मृत्यू

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

सुरत भुसावल रेल्वेमार्गावर दि. 19 रोजी अमळनेर टाकरखेडा रेल्वे स्थानकाजवळ सायंकाळी 5:26 वाजता ट्रेन नंबर 20925 सुरत अमरावती रेल्वेखाली अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

टाकरखेडा यार्ड 262/10 रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेत (ASI) विसावे यांनी पंचनामा केला. मृतदेह पूर्णपणे चिरडला गेल्याने मृत व्यक्तीची अद्यापही  ओळख पटू शकली नाही.

सदर पुरुषाचे वय अंदाजे 48 असल्याचे समजते ही आत्महत्या आहे. सदर व्यक्तीचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या बाबतचा पुढील तपास (ASI) विसावे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.