धर्म संसदेत महात्मा गांधीवर वादग्रस्त विधान; मुख्यमंत्र्यांचा काढता पाय (व्हिडीओ)

0

रायपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

छत्तीसगढची राजधानी रायपुर येथे आयोजित दोन दिवसीय धर्म संसद रविवारी संपली. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातून आलेले कालीचरण महाराज  यांनी महात्मा गांधीविषयी अपशब्द वापरल्याने संतापाची लाट उसळली आहे. या धर्म संसदेत देशभरातून अनेक साधू-संत सहभागी झाले होते. पण कालीचरण महाराजांनी केलेल्या वक्तव्यामुळे संसदेला गालबोट लागल्याचे बोलले जात आहे.

https://twitter.com/NitinRaut_INC/status/1475170567686922250?s=20

छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल  यांनीही धर्म संसदेच्या समारोपाच्या कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचे समजते. कालीचरण महाराज यांनी संसदेत बोलताना गांधीविषयी अपशब्द वापरले. हा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गांधींविषयी अपशब्द वापरून महाराजांनी महात्मा गांधी यांची नथुराम गोडसे याने हत्या केल्याचे सांगत गोडसेचे कौतूकही केले.

लोकांना धर्माच्या सुरक्षेसाठी सरकारच्या प्रमुखाच्या रुपाने एका कट्टर हिंदू नेत्याला निवडून द्यायला हवे, असेही महाराज म्हटले आहेत. कालीचरण महाराजांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री त्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेसचे नेते संजय निरूपम  यांनीही ट्विटरवर व्हिडीओ टाकत त्याचा निषेध केला आहे.

हा भगवाधारी फ्रॉड राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना उघडपणे शिव्या देत आहे. त्याता लगेच तुरुंगात टाकायला हवे. गांधीविषयी वैचारिक मतभेद असू शकतील, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कुणालाच नाही, असं निरूपम यांनी म्हटलं आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

नरेंद्र मोदीजी, तुम्ही हा देश कसा बनवला. महात्मा गांधींना शिव्या दिल्या जात आहेत. समोर बसलेले लोक टाळ्या वाजवत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. हीच खरी महात्मा गांधींना श्रध्दांजली ठरेल, अशी मागणी राऊत यांनी केली आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक  यांनीही यावर ट्विट केले आहे. सत्य, अहिंसेला खोटेपणा आणि हिंसा करणारे कधीही रहवू शकत नाहीत. बापू, हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है, असं मलिक यांनी म्हटलं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.