धक्कादायक .. ‘मतदान’ केलं नाही, म्हणून तलवारीनं कापला कान

0

नवादा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बिहारच्या नवादा  जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे पंचायत निवडणुकीत समर्थनार्थ मतदान न केल्यानं एका व्यक्तीचे कान कापल्याची घटना घडली आहे. नवनिर्वाचित सदस्याच्या मेहुण्यानेच कान कापल्याचा आरोप आहे. याप्रकरणी प्रमुखाच्या नातेवाईकांसह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला प्रमुखांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर, ही हिंसाचाराची घटना समोर आलीय.

पंचायत निवडणुकीत मतदान न केल्यानं कान कापल्याची ही घटना नवादा जिल्ह्यातील मरुई ग्रामपंचायतीत घडलीय. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी प्रमुखाच्या मेहुण्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. निवडणुकीच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जातंय. जखमी युवक मिथिलेश यादव यानं सांगितलं, की तो शेतातून कामावरून परतत होता, त्यावेळी नवनिर्वाचित मुतुर्वा देवी यांचा मेहुणा जयकरण यादव यांच्यासह 4 जणांनी त्यांना घेराव घातला आणि निवडणुकीत मतदान न केल्यानं शिवीगाळ सुरू केली. मिथिलेशनं धमक्या दिल्याचा आरोपही केलाय. दरम्यान, जयकरण यादवसोबत असलेल्या एका तरुणानं तलवारीनं त्याचा डावा कान कापला, असंही त्यानं सांगितलं.

जखमी मिथिलेश यादव हा रोह पोलीस स्टेशन हद्दीतील जागीर गावचा रहिवासी आहे. घटनेच्या वेळी मुतुर्वा देवींचे मेहुणे जयकरण यादव, अजित यादव, कुंदन कुमार आणि संतोष यादव (चारही रा. सुंदरा गाव) उपस्थित होते. मिथिलेशनं सांगितलं की, भावाच्या सांगण्यावरून संतोषनं त्याच्यावर तलवारीनं हल्ला केला आणि त्याचा कान कापला, त्यामुळे तो जखमी झाला. कान कापल्यानंतर खूप रक्त वाहू लागलं, त्यानंतर सर्व आरोपी फरार झाले. पीडित मिथिलेशनं पोलीस ठाणे गाठून चौघांविरुध्द कारवाईची मागणी केलीय. रोह पोलिसांनी जखमींला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलंय. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस अधिक तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.