धक्कादायक : जबरदस्तीने काँग्रेसला मत द्यायला लावले

0

अमेठी :– १७ व्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांत ५१ जागांसाठी मतदान सुरु असून अमेठीमधील एका मतदान केंद्रावर जबरदस्तीने काँग्रेसला मतदान केल्याची घटना समोर आली आहे. याचा खुलासा खुद्द मतदाराने केला आहे. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका वृद्ध महिलेने माझ्याकडून जबरदस्तीचे मतदान करून घेतले असल्याचा आरोप केला आहे. मतदान केंद्रावरील निवडणूक अधिकाऱ्याने त्यांच्याकडून जबरदस्तीने काँग्रेसला मत द्यायला लावले आहे, असे त्या वृद्ध महिलेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे. तसेच ती पुढे म्हणाली, खरेतर मला कमळ चिन्ह असलेले बटन दाबायचे होते पण मला जबरदस्तीने हात चिन्ह असलेले बटन दाबायला लावले. ही घटना गौरीगंज मधील गूजरटोला मतदान केंद्रावर घडली आहे. मात्र या घटनेवर निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.


 

Leave A Reply

Your email address will not be published.