धक्कादायक ː आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी, जावयाला पेटवले

0

अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील निघोज येथे मुलीने आंतरजातीय विवाह केल्याने मुलीच्या काका आणि मामाने दोघांवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्यांची घटना घडली आहे. यात गंभीरपणे भाजलेल्या मुलीचा मृ्त्यू झाला असून मुलावर पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मुलीचे नाव रुक्मिणी रणसिंग असे असून मुलाचे नाव मंगेश रणसिंग असे आहे. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी मंगेश रणसिंह आणि रुक्मिणीचा विवाह झाला होता. आंतरजातीय विवाह झाल्यामुळे रुक्मिणीच्या कुटुंबीयांना हे लग्न मान्य नव्हत. विवाहाच्या सहा महिन्यांनंतर पती-पत्नीचे किरकोळ भांडण झाले आणि रुक्मिणी माहेरी निघून आली. यानंतर मंगेश रुक्मिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला. यावेळी रुक्मिणी त्याच्यासोबत जायला तयार होती. मात्र रुक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मीणीला मंगेश बरोबर न पाठवत त्याला मारहाण केली. त्यानतंर रागावलेल्या रुक्मिणीच्या कुटुंबीयांनी या दोघांना घरात कोंडून त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गु्न्हा दाखल झाला असून मुलीचा काका आणि मामाला अटक करण्यात आली आहे. मुलीचे वडील मात्र फरार झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.