धक्कादायक.. घशात च्युईंगम अडकल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

0

 भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

तालुक्यातील भडगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आलीय. घशात च्युईंगम अडकल्यामुळे एका नववीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. उमेश गणेश पाटील (वय १५, पांढरद ता. भडगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

उमेश हा  भडगाव येथील लाडकुबाई विद्यामंदिर या शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. नववीत शिकणारा उमेश गणिताचा पेपर देऊन शाळा सुटल्यानंतर दुकानावरून च्युईंगम विकत घेतले आणि गावी जाण्यासाठी रिक्षात बसला. थोड्या वेळानंतर च्युईंगम खात असताना घशात च्युईंगम अडकले. यामुळे उमेशला  अत्यंत अस्वस्थ वाटू लागले.

ही बाब लक्षात येताच त्याला भडगाव येथे खाजगी दवाखान्यात आणण्यात आले मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला पाचोरा येथे घेऊन जाण्यास सांगितले. मात्र उमेशने पाचोरा येथे नेत असतानाच वाटेतच प्राण सोडले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.