धक्कादायक ! कोरोना पॉझिटीव्ह येण्याच्या भितीने कोविड सेंटरमधून झाला गायब, मात्र त्याला मृत्यूने गाठलेच

0

अमळनेर :  येथील प्रताप महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये 4 दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल केलेला एक रुग्ण स्वॅब घेण्यापूर्वीच बेपत्ता झाला आहे. दरम्यान, कोरोनाच्या भितीने हा संशयीत रूग्ण कोविड सेंटरमधून गायब झाला मात्र त्याला मृत्यूने गाठलेच.

नेमकं प्रकरण काय?
अमळनेर शहरातील ब्रम्हे गल्लीतील एका कुटुंबातील पती-पत्नीसह त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोव्हिड सेंटरमध्ये 6 जुलैला क्वारंटाईन झाले होते. त्यात पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर पती आणि मुलाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला होता. याच कुटुंबातील एका वृद्धाचा स्वॅब त्यावेळी घेतला नव्हता. म्हणून त्या वृद्धाला 9 जुलै रोजी कोव्हिड सेंटरमध्ये दाखल केले होते. मात्र, स्वॅब घेण्यापूर्वीच ती वृद्ध व्यक्ती बेपत्ता झाली.दरम्यान, यापूर्वी जळगाव व धुळे येथील कोविड सेंटरमधून अशाच रुग्ण बेपत्ता होण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे आता आरोग्य यंत्रणेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.

आणि त्यांचा मृतदेह सापडला
कोविड सेंटरमधून गायब झालेल्या बापू वाणी यांचा शोध घेण्यासाठी दोन पथक कार्यरत करण्यात आले होते. याशिवाय सदर व्यक्‍तीचा फोटा व्हॉटस्‌ऍपवर शेअर करून माहिती कळविण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. दरम्यान विचखेडा (ता. पारोळा) येथे बापू वाणी यांचे अपघाती मृत्यू झाल्याची बातमी आली. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला नोंद झाल्यानंतर नातेवाईकांनी ओळख पटविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.