भारतीय पोस्टात दहावी पास असलेल्यांना थेट नोकरी, 6538 पदे भरणार

15

नवी दिल्लीः भारतीय पोस्ट ऑफिसत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय पोस्ट ऑफिस हजारो पदांवर मोठ्या प्रमाणात रिक्त जागा भरत आहे.पोस्ट ऑफिसमधील या भरतीअंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण 6538 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. तीन राज्यांच्या पोस्ट ऑफिसमधील नोकरीशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घेऊया.

भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या राज्यांत किती जागा रिक्त 

मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या –  2,834

राजस्थान पोस्टल सर्कल मधील पदांची संख्या – 3,262

जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील पदांची संख्या – 442

ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण पदांची संख्या – 6,538

भारतीय डाक विभागाच्या मध्य प्रदेश पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवकांच्या (जीडीएस) 2,834 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2020 आहे. राजस्थान पोस्टल सर्कलमधील जीडीएसच्या 3,262 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2020 आहे. त्याच वेळी, जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता

ग्रामीण डाक सेवकांच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्था / बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी.

वय श्रेणी

ग्रामीण डाक सेवकांच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा नियमानुसार शिथिल केली जाईल.

निवड कशी होईल?

मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत देण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्जानंतर दहावीच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.

पोस्ट ऑफिसमधील या भरतीअंतर्गत मध्य प्रदेश पोस्टल सर्कल, राजस्थान पोस्टल सर्कल आणि जम्मू-काश्मीर पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस)च्या एकूण 6538 पदांसाठी भरती करण्यात येणार आहे.

 

15 Comments
  1. Paradke Mohan saysing says

    Post

  2. yash Anil Mane says

    Maharashtra main nahi kya

  3. Ajay Rama Gawali says

    I need jod .I wish to approval me

  4. Rohan Ugale says

    Please job

  5. Deepak Shivram Patyane says

    Hi
    My Details upadate email

    Thanks Regards
    Deepak

  6. Nahush Dugaje says

    School- Gokhale education society
    Percentage-60.20

  7. Pravin sonya nadge says

    10 th pass हो टके 47.40 हे मिलेगी कीय नोकरी

  8. Mahesh PrakashHiraskar says

    Post office

  9. Hitesh suresh bagul says

    [email protected]
    At. Amburdi post. Chankapur
    Tal. Lakvan dist. Nashik
    Pin. 423502

  10. Samiksha bhamburkar says

    Join job

  11. Sonali laxman ghodake says

    Please email address not publish

  12. Shivdad maharu Thorat says

    Garamin post

  13. Bhagawat vasant sonawane says

    Nice information

  14. Ganesh Zurde says

    Job Aaply

  15. Sagar Shantaram Mahajan says

    Nokri

Leave A Reply

Your email address will not be published.