दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील ३५ वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाल्या आहेत. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र शिवाजी सगरे (वय ४०, रा. लक्ष्मी नगर जळगाव) हे पत्नी कविता जितेंद्र सगरे (वय ३५), मुलगी जयश्री (वय ९) आणि मुलगा रोहित (वय १२) यांच्यासह वास्तव्याला आहे. जितेंद्र सगरे हे मिस्त्री काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी २० डिसेंबर रोजी सकाळी ४ वाजता जितेंद्र सगरे यांची पत्नी कविता ह्या कुणालाही काहीही न सांगता मुलगी जयश्री आणि मुलगा रोहित यांच्या सोबत बेपत्ता झाल्या आहे.

जितेंद्र सगरे यांनी पत्नी व दोन्ही मुलांचा नातेवाईक व ओळखीच्या नागरीकांकडे शोधाशोध केली परंतू कुठेच सापडल्या नाहीत. विवाहितेला हिन्दी, पावरा व अहिराणी भाषा बोलता येते.  सोमवारी २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता जितेंद्र सगरे यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद केली केली आहे. याप्रकरणी पुढील तपास  पोलिस नाईक सिकंदर तडवी तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.