दोन मजली इमारत कोसळली; ७ जण बचावले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील शनिपेठ भागातील १७ नंबर शाळेच्या समोरील दोन मजली इमारत अचानक कोसळली.  ही घटना आज पहाटे ५ वाजेच्या  सुमारास घडली असून यात सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. तर घटनेमुळे मोठी वित्तहानी झाली आहे.

शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली दोन मजली इमारत अचानक कोसळली. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याची माहिती मिळाली नाही. मात्र यात बारा जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. तर यातील सात जण जखमी झाले आहेत. यात एका वृध्द महिलेस मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते कृणाल महाजन यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.

याच इमारतीच्या बाजूला अलीकडेच एका नव्या इमारतीची बांधकाम सुरू करण्यात आले असून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. या विना परवानगी इमारतीच्या कामामुळेच ही दोन मजली इमारत कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.