दुर्दैवी ; धर्माबादेत कोरोनामुक्त झाल्यावर प्रौढाचा मृत्यू

0

नगरपालीकेनेसुध्दा सहकार्य केले नाही ; अखेर कुटुंबातल्या लोकांनी केले अंत्यसंस्कार.

धर्माबाद (प्रतिनिधी) : माणसाचा मृत्यू अटळ आहे, कोणत्या ना कोणत्या कारणाने मृत्यू पावतोच.  सध्या कोरोनाची अशी भीती झाली की, नाते -गोते समाज दुर होत आहे. एक प्रकारे माणुसकीची -हास होत असताना दिसते आहे.अशाच प्रकार धर्माबाद शहरातील इंदिरानगर येथील सेवानिवृत्त  रेल्वे कर्मचारी माधवराव बापूराव माने वय 75 यांचे कोरोना मुक्त होऊन घरी आल्यावर पाच तासांनंतर त्याच दिवशी दि. 15 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता दुर्दैवी मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत्यू झाला म्हणून समाजातील नागरीक आले नाही की सहकार्य केले नाही.एवढेच नसुन नगरपालीकेने सुद्धा सहकार्यला वर हात केले.अखेर समाजातील एका माजी नगरसेवकांनी  माणुसकी दाखवली अखेर नातेवाईकातीलच मुलं, जावई  व घरच्या लोकांनीच रात्री बारा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

दि. 9 सप्टेंबर रोजी माधवराव माने यांना कोरोना  पॉझिटिव्ह निघाला होता.नांदेड येथील दवाखान्यात जागा नसल्याने ग्रामीण रुग्णालय मध्ये रात्रभर ठेवण्यात आले, 10 सप्टेंबर रोजी सकाळी निजामबाद येथील शासकीय दवाखान्यात ऑक्सीजन साठी जावई  सुरेश सोनकांबळे यांनी घेऊन गेले.  दि.15 सप्टेंबर रोजी निगेटिव निघाल्याचा दाखला डॉक्टरांनी दिला.ठणठणीत झाले. मुलगा संजय यांने  आपल्या वडीलाला गावी घरी घेऊन आले. माधव माने यांना आंघोळ करून जेवायला दिले परंतु रात्री नऊच्या सुमारास अचानक मृत्यू झाला.

रुग्ण पॉझिटिव्ह मुळे मृत्यू झाला म्हणून,  रात्रीची वेळ, कुणीही मदत करण्यास तयार नाही, अशावेळी माजी सभापती गंगाधर जारीकोटकर  यांनी मोलाचे सहकार्य केले.  नगरपालिकेला कचरा टाकण्याचा ट्रॅक्टर मागितला पण नगरपालीकेनेही सहकार्य केले नाही, विशेष म्हणजे कोणताही ड्रायव्हर येण्यास भीत होता , अखेर माजी सभापती गंगाधर जारीकोटकर यांनी खाजगी टेम्पो तयार करून वैकुंठधाम येथील समशान  भूमीत रात्री बारा वाजता कुटुंबातल्या लोकांनी अंत्यसंस्कार केला. प्रेतास कोणी हात लावण्यास तयार नव्हते अशावेळी नातेवाईकातील  संघर्ष वाघमारे, सुरेश सोनकांबळे, वाघमारे, गजानन वाघमारे,  रत्नपाल मोरे, लखन टाकळीकर प्रकाश झगडे,उत्तम सोनटक्के यांनी धाडस करून रात्री बाराच्या सुमारास स्वतः  चित्ता रचून  अग्नी दिला. पण कोरोनामुक्त झाल्यावरही भीतीने अंत्यसंस्कारला समाजाने नाकारले.

Leave A Reply

Your email address will not be published.