कांदा निर्यात बंदीचा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा ; माजी आ.राणा दिलीपकुमार सानंदा

0

खामगांव (प्रतिनिधी)  शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे.कांद्याला समाधानकारक भाव मिळत असतांना केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानक कांदा निर्यातबंदी लागू केल्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत जाणुन-बुजुन अधिकची वाढ केली आहे. या निर्णयामुळे महाराष्टासह अन्य राज्यातील लाखो कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहे. केंद्र सरकारचा कांदा निर्यात बंदीचा निर्णय हा शेतकÚयांवर अन्याय करणारा असून केंद्र सरकारने हा अन्यायकारक निर्णय तात्काळ मागे घेवुन बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी केली आहे.

कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरुध्द शुक्रवार दि.18 सप्टेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर काॅंग्रेसजणांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.त्याप्रसंगी बोलतांना त्यांनी उपरोक्त प्रतिपादन केले.यावेळी शेगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजय काटोले,नगरसेवक किषोरआप्पा भोसले,नगरसेवक अब्दुल रशीद अब्दुल लतीफ,पं.स.सदस्य विठठ्ल सोनटक्के,मनिश देषमुख,खामगांव विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मंगेष इंगळे,माजी जि.प.सदस्य सुरेषसिंह  तोमर,पंजाबरावदादा देषमुख यांच्यासह काॅंग्रेसच्या विविध सेल,संघटनांचे पदाधिकारी व शेतकरी बांधव यांची उपस्थिती होती.

पुढे बोलतांना राणा दिलीपकुमार सानंदा म्हणाले की, एैन उन्हाळा काळात शासनाने टाळेबंदी लागू केल्यामुळे शेतक-यांना कांदा कवडीमोल भावात विकावा लागला होता. आता कुठेतरी कांद्याचे चांगले उत्पादन होवुन भाव सुध्दा चांगले मिळत होते. त्यातच मोदी सरकारने अचानक निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कोसळले आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय शेतक-यांना देशोधडीला लावणारा आहे, शेतकÚयांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही. कांदा जीवनाश्यक वस्तूमध्ये समाविष्ठ नसल्याने त्यावर सरसकट निर्यातबंदी करणे योग्य नाही. केंद्र सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणाचा काॅंग्रेस जणांच्या वतीने सानंदा यांनी तीव्र शब्दात निषेध करुन कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेवुन शेतक-यांना न्याय द्यावा अन्यथा शेतक-यांचे कर्दनकाळ असलेल्या मोदी सरकारला जागे करण्यासाठी काॅंग्रेसजणांच्या वतीने यापुढे अधिक तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी दिला.

यावेळी कांॅग्रेसजणांनी व उपस्थित शेतकरी बांधवांनी गळयात कांद्याचे हार घालुन भाजप सरकार विरोधात कांदा निर्यातबंदी उठवलीच पाहिजे-उठवलीच पाहिजे,किसान विरोधी-नरेंद्र मोदी,भाजप सरकार हाय-हाय अश्या जोरदार घोषणाबाजी केली व या निर्णयाचा निषेध म्हणून तहसिलदारांमार्फत पंतप्रधान मोदींना भेट म्हणून 5 किलो कांदा पाठविण्यात आला. यावेळी चैतन्य पाटील, निलेश देशमुख, एजाज देशमुख, गोविंद वाघ, बाजार समितीचे माजी संचालक श्रीकृष्ण टिकार,मनोज वानखडे, गजानन सोनोने, गोपाल फंदाट, जनार्दन मोरे, अक्षय राउत, ज्ञानेश्वर काळे,मुरलीधर बहादरे, दिलीपसिंह पवार, अनंता गावंडे, भिकाजी मुयांडे, रोहित राजपुत, सुरेश बगाडे, बिलाल खाॅ पठान,प्रितम माळवंदे, पिंटु जाधव, रमेश कोळसे, बाळु पाटील, मयुर सातव, भाग्येश भगत, श्रीकांत देशमुख, विशाल वानखडे, शेख उस्मान, वैभव गायकवाड, वैभव काळे, स्वप्नील ठाकरे, अंकुश टिकार, नागेश वराडे,संतोष चव्हाण, नवलसिंग बोराडे, माणिकराव देशमुख, भरतसिंग तोमर, मर्दानसिंग तोमर, नितीन तोमर, अनंता सातव, गोपाल हिंगणे, ज्ञानेश्वर शेजोळे,आनंदराव शिंगणे, आकाश जैस्वाल, ताराचंद राठोड, काशिराम डांगे यांच्यासह काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते.

तद्नंतर उपविभागीय अधिकारी खामगांव यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांना कांदा निर्यात बंदी उठविण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्याबाबत विनंती करणारे निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनावर शेकडो शेतकरी बांधव व काॅंग्रेस जणांच्या सहया आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.