सामनेरला दशक्रिया व गंधमुक्ती विधिनिमित्त वृक्ष लागवड

0

पाचोरा (प्रतिनिधी) : सामनेर ता. पाचोरा येथील सर्वोदय बहुउद्देशीय संस्थेच्या पर्यावरण समृद्ध ग्राम संकल्पनेतील वृक्ष लागवड व संवर्धनाच्या “हरीत निर्माण” उपक्रमांतर्गत कै. देवराम चिंतामण पाटील, माजी सरपंच सामनेर तथा कला वाणिज्य महाविद्यालय सामनेरचे संस्थापक चेअरमन कै. वसंत (बापू) पंडीत पाटील, प्रसिद्ध भजनी व  भारुडरत्न यांचे दशक्रिया व गंधमुक्ती निमित्त स्मृती प्रित्यर्थ सर्वोदय संस्था व साळुंखे कुटूंबियांकडून वृक्ष लागवड करण्यात येऊन या दोघेही समाज घटकांना अनोखी श्रद्धांजली वाहण्यात आली.

कोरोना महामारीने निसर्गशक्तीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून या काळात सर्व प्रकारच्या व्यवहारांसोबतच सामाजिक व धार्मिक विविध संस्कारांवरही मर्यादा घालत ते साजरे करावे लागत आहेत. कुठलाही बडेजावपणा अथवा मोठे धार्मिक कार्य याकाळात करणे दुरापास्त होऊन बसले. तसेच समाजाचे सुदृढ व परिपक्व पणाचे लक्षणही यातून सिद्ध होतांना आता दिसत आहे. नवनवीन कल्पना व संकल्पनांना आता लोक आपलेसे करू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून सामनेरला सर्वोदय संस्थेकडून कै. देवराम चिंतामण पाटील, माजी सरपंच सामनेर तथा कला वाणिज्य महाविद्यालय सामनेरचे संस्थापक चेअरमन कै. वसंत (बापू) पंडीत पाटील, सुप्रसिद्ध भजनी व  भारुडरत्न यांचे दशक्रिया व गंधमुक्ती निमित्त मरावे परि, वृक्षरूपी उरावे या नाविन्यपूर्ण संकल्पनेला हात घालत या साळुंखे कुटुंबातील दोघेही सदस्यांच्या एकाच दिवशी होणाऱ्या दशक्रिया व गंधमुक्ती विधी दिनी वृक्ष लागवड करत सर्वोदय संस्था व परिवारातील सदस्यांकडून अनोखी श्रद्धांजली वाहून दोघांच्याही स्मृतीनिमित्त वृक्ष रूपाने मूर्त स्वरूपात ठेवत असल्याचा मानस यामागे प्रकर्षानं दिसून आला व त्याचा समाजामध्ये एक चांगला संदेश जात पर्यावरण संवर्धनाचेही काम त्यामुळे साधले जाईल असा उत्तम आदर्श यामुळे समाजापुढे ठेवता आला हेही निश्चित असे जनमाणसांच्या क्रिया प्रतिक्रियांवरून जाणवले.

यावेळी ज्ञानेश्वर पाटील, बबन पाटील, बाळकृष्ण पाटील, शांताराम पाटील, सुनील पाटील, रमेश पाटील, श्रीराम पाटील, भगवान पाटील, अमोल पाटील, मनोज पाटील, प्रा. राजेंद्र साळुंखे, तुषार पाटील, राजेंद्र पाटील,गोलू पाटील, किशोर पाटील, पाहुणे मंडळी व सर्वोदयचे नरेंद्र पाटील व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.