दिव्याने पेट घेतल्याने किराणा दुकानाला आग; ५० हजाराचे नुकसान

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा शहरातील बाजारपेठेत किराणा दुकानाला आग लागल्याची घटना रात्री घडली.

बाजारपेठेतील कृषि उत्पन्न बाजार समिती चे संचालक प्रकाश नामदेव वाणी यांचे  बाजार पेठेत समर्थ किराणा नावाने किराणा दुकान असुन ते दि. २० सोमवार रोजी रात्री ८. ३० वाजता  आपले दुकान बंद करून गेले असता काही वेळाने त्यांचा दुकानातुन धुर निघत असल्याचे बाजुच्या सलुन व्यवसायिकाने पाहिले त्यांनी लागलीच दुकान मालकास दुरध्वनी द्वारे कळविले.

याच किराणा दुकानाला लागुन विक्रम लालवाणी यांचे बी. जी. गारमेन्टस् नावाचे कापड दुकान असल्याने नेमके कोणत्या दुकानातुन दुर निघत आहे, कळत नसल्याने त्यांना ही बोलविण्यात आले. सुदैवाने काही वेळेतच आगीवर निंयत्रण मिळवल्याने मोठी हानी टळली.

या वेळी आजुबाजुच्या दुकानदारांनी  मदत करत आगीवर निंयत्रण मिळविले या आगीत पन्नास हजाराच्या जवळपास नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक आशिष शिरोळे, केतन शिरोळे यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.