दिलासादायक! देशात ७० लाखांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त ; पाहा आजची आकडेवारी

0

नवी दिल्ली :  मागील २४ तासांमध्ये देशभरात ५३ हजार ३७० नवे करोनाबाधित आढळले, तर ६५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख १४ हजार ६८२ वर पोहचली आहे.

 

देशातील एकूण ७८ लाख १४ हजार ६८२ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ८० हजार ६८० अॅक्टिव केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख १६ हजार ४६ जणांचा समावेश आहे. २३ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,१३,८२,५६४ नमून्यांची करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली. ज्यापैकी १२ लाख ६९ हजार ४७९ नमने काल तपासण्यात आले. आयसीएमआर कडून ही माहिती मिळाली आहे.

 

देशातील करोनाची स्थिती निश्चित कशी आहे हे ठरविण्याच्या दृष्टिकोनातून पुढील तीन महिने निर्णायक ठरणार आहेत, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. आगामी उत्सवांचा काळ आणि हिवाळ्यात जनतेने कोविड-१९ बाबत योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.

 

दरम्यान, ऑक्सफोर्डच्या लशीनंतर आता सर्वाचं लक्ष भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लशीकडे लागलं आहे. नुकतंच या कंपनीच्या लशीला तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी परवानगी मिळाली आहे. याच दरम्यान भारत बायोटेक कंपनीने मोठा दावा केला आहे. जून 2021 पर्यंत ही लस उपलब्ध होईल असा कंपनीने दावा केला आहे. सध्या भारत बायोटेक कंपनी कोव्हॅक्सिनवर काम करत असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणी नोव्हेंबरपासून सुरू होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.