यावल येथे रावण दहणचा कार्यक्रम होणार रद्द

0

यावल (प्रतिनीधी) : यावल तालुक्यांतील सर्व जनतेस जाहीर निवेदन आहे की सलग २१ वर्षा पासुन सुरु असलेला विजया दशमी ( दसरा ) च्या दिवशी होनारा रावण दहण चा कार्यक्रम या वर्षी रद्द करण्यात आला आहे.

 

संपुर्ण देशामध्ये कोविड १९ कोरोना या रोगाने गेले सहा महीने झाले आपण संघर्ष करत आहेत आपल्या देशामध्ये कधीही बंद नसनारी रेल्वे , बस , मंदीरे , शाळा काॅलेज शासकीय कार्यालय , बाजार दुकाने हा रोग पसरुनये म्हणून आपनास बंद ठेवावे लागले या वर्षीचे दहीहंडी , गणपती , नवरात्री असे उत्सव सण आपनास रद्द करावे लागले.

 

या कोविड १९ च्या कोरोना महामारी संघर्षां मध्ये आपण सर्वानी प्रशासनास सहकार्य केले सर्वानी आपापल्यापरीने गोरगरीबाना जी मदत केली सहकार्य केले असे कोणत्याही देशामध्ये घडले नाही ते आपन करुन दाखवलेहळुहळु आपले जनजीवन  पूर्वपदावर येत असतांना आपण आपल्या कुटूंबाची काळजी घ्यायची आहे अजुनही हे संकट टळलेले नाही दुर्दैवाने या रोगाचे बळी ठरलेले आपलेच कुनाचे वडील कुनाची आई तर कुनाचा करता मुलगा , मुलगी कुनाचे पती तर कुनाची पत्नी जवळचे काळजाचे व्यक्ती दुर्देवाने या आजाराचे बळी ठरले या सर्वांच्या  दु:खात आपन सर्वच सहभागी आहोतच आपन आपल्या जवळच्या व्यक्तीची काळजी घेतली पाहीजे शासनांच्या नियंमांचे या देशाचा सुज्ञ व्यक्ती म्हणून काटेकोरपणे पालन केले पाहीजे.

या महामारीचा प्रसंगी जा आरोग्य सेवा पुरवणारे डाॅकटर व आरोग्यसेवक सुरक्षा पुरणारे पोलीस अधिकारी पोलीस करमचारी   शासकीय अधिकारी व त्यांचे करमचारी , शिक्षक व शिक्षण संस्थानी व सेवाभावी संस्थाचे सेवक , राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सहकारी संस्थानाचे पदाधिकारी , व्यापारी , शेतकरी , मजुर या सर्व तळागळातील व्यक्तीनी या संकटात सहकार्य केले त्यांच्या विषयी कृतज्ञता दाखविले त्यांना लढण्याचे बळदीले या सर्वाचे मि व माझ्या सहकार्याचें वतीने आभार व्यक्त करतो व आपनास सर्वांना उत्तम निरोगी आरोग्याचा शुभेच्छा देतो.

रावण दहणाचा कार्यक्रमा मध्ये फार मोठ्या प्रमानात गर्दी होते व शासनाचा नियमानुसार सार्वजनिक कार्यक्रमास बंदी असल्याने तुर्तास ह्या वर्षी रावण दहणा चा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी असे रावण दहण समितीचा वतीने आव्हान प्रा मुकेश येवले.नगरसेवक तथा तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावल अध्यक्ष – रावण दहण समिती  छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यावल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.