श्री.गो.से.हायस्कूल, पाचोरा येथे शिक्षकांची कोविड चाचणी

0

पाचोरा (प्रतिनिधी) : गो.से.हायस्कुल, पाचोरा येथे दि. २३ रोजी सकाळी १० ते १२ वाजेच्या दरम्यान मुख्याधिकारी नगरपालिका मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित सांळुखे, यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड चाचणी घेण्यात आली. मुख्याध्यापक सुधीर पाटील, उपमुख्याध्यापिका प्रमिला वाघ, पर्यवेक्षक आर. एल. पाटील, सकाळसत्र, दुपारसत्र, टेक्निकल,  एम.सी.व्ही.सी. चे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांची रॅपिड अॅन्टीजन कोविड १९ चाचणी घेण्यात आली. परमेश्वर कृपेने सर्वांची चाचणी निगेटिव्ह आली असून, सर्वांनी आनंद व्यक्त केला. कोविड १९ च्या पथकात न. पा. आरोग्य सहाय्यक गजानन काकडे, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, भुषण काटे, आकाश खैरनार यांनी सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे मनोधैर्य वाढवून चाचणीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण केले. शाळेच्यावतीने चाचणी पथकातील सर्वांचे आभार मानले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.