दिलासादायक : जळगाव जिल्ह्यात आज ४९४ नवे रुग्ण ; तर ५१२ कोरोनामुक्त

0

जळगाव प्रतिनिधी। जिल्ह्यात कोरोना संसर्गाची तीव्रता मार्च व एप्रिल महिन्यात प्रचंड वाढल्यानंतर मे महिन्यात उतरता आलेख सुरु झाला आहे. मागील काही दिवसापासून नव्या रुग्णांपेक्षा बरे होणारे रुग्ण अधिक आहे. तर आज नवे रुग्ण ५०० शेच्या आत आढळून आले आहे. आज दिवसभरात ४९४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५१२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. मात्र मृताचा आकडा वाढताच आहे. गेल्या २४ तासात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

आजच्या आकडेवारीनंतर  जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ७७९ वर पोचली आहे. त्यापैकी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १ लाख २४ हजार ८५८ वर गेली आहे.जिल्ह्यात सध्या ९४७१ रुग्ण उपचार घेत आहे.  तर गेल्या २४ तासांत १२ जणांचा बळी गेला असून बळींचा आकडा २४५० झाला असून नॉन कोविड, सारी, न्युमोनिया व कोविड संशयित अशा ६ जणांचा मृत्यू झाला.

असे आढळले रुग्ण

जळगाव शहर ४४, जळगाव ग्रामीण १७, भुसावळ ७८, अमळनेर १८, चोपडा ४९, पाचोरा ०९, भडगाव ०१, धरणगाव २५, यावल ३३, एरंडोल २२, जामनेर ३४, रावेर ३१, पारोळा ०७, चाळीसगाव ४७, मुक्ताईनगर ४०, बोदवड ३७, अन्य जिल्ह्यातील २ असे एकूण ४९४ रुग्ण आढळले

Leave A Reply

Your email address will not be published.