दिनेश पवार या ध्येय वेड्या युवकाने गाव केला शिक्षणाने बोलका

0

चाळीसगांव (प्रतिनिधी) :  कोरोनाने संपुर्ण जग वेठीस धरले आहे.या विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या शैक्षणिक वर्षांतील शिक्षण अद्याप बंद आहे.त्यामुळे ग्रामिण भागातील मुलांचे आतोनात शैक्षणिक नुकसान होत असल्याचे बघून चंडीकावाडी(पाटणा) येथील चित्रकार दिनेश पवार या युवकाने सामाजिक जाणिवेतून ‘माझं गांव-माझी सामाजिक जबाबदारी’ हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.पाटणा(चंडीकावाडी) या गावातील घरांच्या,दुकानांच्या भिंतीवर शैक्षणिक चार्ट रंगवून गावातील वातावरण शिक्षणदायी केले आहे.याकरीता या अवालिया चित्रकाराचा सर्वत्र कौतुक होत आहे.

दिनेश रामदास पवार हे चाळीसगांव तालुक्यातील चंडीकावाडी (पाटणा)या ऐतिहासिक खेड्यातील रहिवासी आहे.घरची परिस्थिती अत्यंत बेताची वडील हातमजुरी करुन संसाराचा गाडा ओडीत पाल्य दिनेशचे चित्रकलेची आवड बघून त्यास कलेचे शिक्षण मिळवून दिले.लहानपणापासून कलेची जोपासना करणार्‍या दिनेशने सुरुवातीस स्वत:च्या घराच्या भिंती रंगवून आवड जोपासली.या कलाश्रीच्या या आकर्षक कलाशैलीचे गावकरी तसेच मित्रमंडळीकडुन कौतुक करण्यात आले.या प्रेरणेने प्रेरीत होऊन या क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली.आज रोजी अनेक शाळेंच्या भिंती बोलक्या केलेल्या आहे.यामुळे थोड्याच दिवसात शैक्षणिक क्षेत्रातील आवडता चित्रकार म्हणून ख्याती मिळविली आहे.या कलागुणांस ते करीत असलेल्या सत्कृत्यामुळे आज सामाजिक जाणिवेची किनार लागलेली पहावयास मिळत आहे.

या प्रेरणेतूनच या कोरोनाच्या कालावधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे.ही बाब प्रकर्षाने त्यांना जाणवत होती.ग्रामिण भागात सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे.शेतकरी व मजूर दिवसभर शेतात असल्याने मुले एकटीच घरी राहतात.त्यामुळे देशाच्या या भवितव्याची चिंता विचलित करीत होती.या भावनेने या नवतरुणाने जरी परिस्थिती बेताची असली तरी स्वत:खर्च करीत पुर्ण गाव शिक्षणाच्या ज्ञानगंगेने बोलका करुन टाकण्याची किमिया या ध्येय वेड्या तरुणाने घडवून आणली.आज गावातील मुलेच नाही तर प्रौढ नागरिकांना सुद्धा या उपक्रमाचा फायदा होत असल्याची बाब समोर आली आहे.गावातील गावकरी शालेय मुले येता-जाता शैक्षणिक ज्ञान घेत आहेत.दिनेश पवार यांच्या कार्याची ही बाब निश्चितच इतर युवकांकरीता प्रेरणादायी असून सर्वत्र या युवकाच्या कलेचा व स्व:खर्चातून रंग आणून केलेल्या सत्कृत्याचा कौतुकास पात्र होत आहे.या नाविन्यपुर्ण उपक्रमाकरीता सचिन राठोड यांचेही विनामूल्य हातभार लागत आहे.व कार्य यशस्वी होण्यास मदत झाली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.