धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करू नये

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  मागील काही वर्षांपासून धनगर तसेच इतर काही जातींतील अनुसूचित जमातींना असलेले ७ टक्के आरक्षणात समावेश व्हावा म्हणून घटनाबाह्य पध्दतीने मागणी करत असल्याचे दिसत असतांना यामध्ये धनगर समाज आघाडीवर आहे. अनेक अभ्यासगटांनी त्यांची मागणी चुकीची असल्याचे ही सांगितले आहे. आदिवासी समाज बांधव जे अनुसुचित जमाती मध्ये येतात त्यांच्या परंपरा, भाषा, स्वभाव, वैशिष्ट्ये व धनगर समुदायाच्या परंपरा यातही फरक आहे.

तरी महाराष्ट्र शासनाने ही सर्व परीस्थीती लक्षात घेवून सरकारला आदिवासींच्या आरक्षणात धनगर समाजाला समाविष्ट करू नये, अशा आषयाचे निवेदन एकलव्य संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे व जिल्हाध्यक्ष सुधाकर वाघ, यांचा आदेशानुसार तहसिलदार,  पोलिस स्टेशन यांना देत आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष गणेश वाघ, उपाध्यक्ष रोहिदास जाधव, विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष कैलास सोनवणे, विकास शिंदे, विजय भिल, अनिल जाधव, आप्पा सोनवणे, सुकलाल मोरे, विजू ठाकरे, संतोष महाले, सुमित बागुल, योगेश पिंपळे, भिवसन सोनवणे, सुनील सोनवणे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.