दहावीच्या परीक्षा मूल्यमापन पद्धतीत बदल

0

यापुढे विद्यार्थ्यांना 100 गुणांची लेखी परीक्षा  पैकीच्या पैकी मार्कस मिळणे अवघड

जळगांव. दि.22-

नेहमीप्रमाणे दहावीची परीक्षा म्हटली की, विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण कुटुंबदेखील एकप्रकारे तणावतच दिसून येते. मात्र या वर्षाची परीक्षा ही तर खरोखरच विद्यार्थ्यांसह पालकांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने पुर्वीप्रमाणेच एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमानुसार तोंडी परीक्षेच मार्क देणे बंद केले असून दहावीच्या परीक्षेमधील मूल्यमापनाच्या पद्धतीत या वर्षा पासून बदल केला आहे. यापुढे विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्कस मिळणे अवघड होणार आहे. चार विषयांची तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापनाचे गुण देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे तोंडीच नव्हेतर विद्यार्थ्यांची मोठी कोंडीच होणार, असे सध्या दिसून येत आहे.
माध्यमिक शाळांकडून तोडी परीक्षेचे गुण आतापर्यंत हे सहजपणे देण्यात येत होतेे. यापुढे विद्यार्थ्यांसमोर या गुणांची भरपाई करण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. यामुळे शिक्षण तज्ज्ञांकडून या शैक्षणिक सत्राचा निकाल घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुणांच्या या बदलांमुळे विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला असून, घरोघरी याची प्रचिती येत आहे. शिक्षण मंडळातर्फे अभ्यासक्रम पुनर्रचनेच्या आधारे विषय रचनेत व गुणप्रणालीत बदल करण्यात आले आहेत. दहावीत विद्यार्थ्यांना तीन भाषा विषय अनिर्वाय आहेत. मागील वर्षापर्यंत या विषयांचे मूल्यमापन हे लेखी तोंडी परीक्षांच्या आधारावर व्हायचे. 80 गुण लेखी परीक्षेचे व 20 गुण तोंडी परीक्षेचे राहायचे. यातील तोंडी परीक्षेचे गुण शाळांच्या हाती असायचे व त्यात विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळत होाते. मात्र तोंडी परीक्षा यावर्षापासून बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांना 100 गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. भाषा विषयात 20 गुणांचा हा फरक भरून काढणे ही कठीण बाब आहे.
दुसरीककडे सामाजिकशास्त्र विषयात 100 पैकी 20 गुण प्रकल्पांवर आधारित होते. साहजिकच विद्यार्थ्यांना यात चांगले गुण मिळत. मात्र सामाजिकशास्त्राचे मूल्यमापन पूर्णत: लेखी परीक्षेच्या आधारावर होणार आहे. भाषा व समाजिकशास्त्र हे विषय मिळून विद्यार्थ्यांच्या हक्काचे 80 गुण हातातून गेले आहेत. हे गुण विद्यार्थ्यांना लेखी परीक्षेच्या माध्यमातूनच मिळवावे लागणार आहेत. साहजिकच मागील वर्षीच्या तुलनेत यंदा निकाल घटणार असल्याचे शिक्षण तज्ज्ञ सांगतात.
यावर्षी दहावी परीक्षा अभ्यासक्रम कृतीवर आधारित प्रश्नपत्रिका आहेत. शासनाने विद्यार्थ्यांचा स्व:मताचा विचार केला असल्याने विद्यार्थ्यांना भरपूर अभ्यास करावा लागणार आहे. तसेच ही पद्धत योग्य आहे. – देवीदास महाजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी, जि.प. जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.