औष्णीक विज केंद्रामुळे वरणगावाच्या तापमानात वाढ; सीएसआर फंडातून वृक्ष लागवडीची मागणी

0

 

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

भूसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णीक विज केंद्राच्या वाढत्या विस्ताराने वरणगाव व परिसरातील शेती पिके नष्ठ तर होतच आहे. त्याच बरोबर तापमानातही दोन अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाल्याने वरणगावच्या माजी नगराध्यक्षासह नागरिकांनी मुख्य अभियंता यांना निवेदन देत सीएसआर फंडातून परिसरात वृक्ष लागवडीची व संगोपनाची मागणी केली आहे.
दिपनगर औष्णीक विज निर्मिती केंद्रात कोळश्यापासून होणाऱ्या विज निर्मीती मुळे परिसरात कमालीचे तापमान वाढ झाली असून,जळगाव जिल्हयात कमाल तापमान ४३ अंश गेल्याने वृद्ध व नवजात बालकांचे यामुळे हाल होत आहे. तर शेतातील उभी पिक करपून जात असून शेतकऱ्याच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असल्याने वरणगाव पर्यावरण व मानवी जिवन संरक्षण समीतीच्या मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांना निवेदन देण्यात आले.
सीएसआर फंडातून वरणगाव परिसरात वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करावे, जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर घेण्यात यावे, तर भविष्यात विज केंद्राचा नवीन ६६० मेगावॅटचा प्रल्कप सुरू झाल्या नंतर परिसरावर याचा मोठा परिणाम होणार असल्याची भिती व्यक्त करीत वेळीच उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. तर निवेदनाची दखल घेत मुख्य अभियंता यांनी तातडीने उपाय योजना करण्याचे अश्वासन दिले.
निवेदन देते वेळी समितीचे सुनिल काळे, मयूर शेळके, मुस्लीम अन्सारी, मिलीद भैसे, नामदेव मोरे, फजल शे नुर मोहम्मद, सुभाष पोतदार, सुनिल माळी, पितांबर पाटील, नाना चौधरी, हितेश चौधरी, राम माळी आदीसह परिसरातील नगरिक व शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.