मुख्याधिकारी यांनी पंचशील नगराची पाहणी केली ; रहिवाश्यांचे निवेदन

0

भुसावळ दी 22 (प्रतीनिधी ) –
भुसावळ शहरातील पंचशील नगर प्रभाग क्रमांक 18 मध्ये असलेल्या विविध समस्याबाबत भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांना निवेदन दिले होते .व समस्या न सोडविल्यास 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी आपल्या सहकार्यासह प्रभाग क्रमांक अठरा मधील समस्याची पाहणी करून समस्या सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
शहरातील पंचशील नगर मध्ये महिलांचे व पुरुषांचे शौचालयाची दुरवस्था झाली असून महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तसेच प्रभागातील गटारांची व नाल्याची कित्तेक दिवसापासून साफ-सफाई न झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील महिलांचे व पुरुषांचे शौच्छालयाची दुरुस्ती करून नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच नाल्याची दररोज साफ सफाई करावी याबाबतचे निवेदन भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे व कार्यकर्त्यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिले होते .त्याची त्वरित दखल घेऊन मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांनी आज प्रभागाची पाहणी करून त्वरित नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे याप्रसंगी जिल्हा महासचिव दिनेश इखारे, भुसावळ तालुकाध्यक्ष रुपेश साळुंके, दिलीप भालेराव, अरुण नरवाडे, बेबाताई बागुल, शोभाताई हिवरे, शेख हसन शेख कालु,नंदाताई तायडे,हसिनाबाई,प्रभाताई चौधरी, ममताताई चौधरी, वैशुताई चौधरी, तुषार जाधव, विद्यासागर खरात युवा भुसावळ शहराध्यक्ष, पल्ला घारु,भिमा तायडे, व पंचशील नगर मधील महिला व पुरुष उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.