शहरात जुगार अड्ड्यावर धाड, बडे व्यापार्‍यांचा सहभाग

0

जळगाव,दि २३ –

जिल्हयात अनेक ठिकाणी जुगार, हातभट्टीसह अवैध धंद्यावर गेल्या काही दिवसांपासून धाडसत्र सुरू असतांना बुधवार दुपारी अत्यंत गजबजलेल्या मोठया व्यापारी संकुलात जुगार अड्डयावर अत्यंत खात्रीशीर रित्या मिळालेल्या वृत्तानुसार जिल्हापेठ पोलिस ठाणे कर्मचार्‍यांनी धाड टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या तसेच विविध शासकिय प्रशासकिय कार्यालये असलेल्या बी. जे. मार्केट परिसरातील बाबा प्लाझा येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून जिल्हा पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे यांच्या आदेशानुसार जिल्हापेठ पोलिसांकडून धाड टाकण्यात आली. याठिकाणी सुमारे 35 ते 40 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम घटनास्थळी सुरू आहे. एका राजकीय पुढार्‍यांचा हा क्लब असल्याचे सांगण्यात येत आहे.या कारवाई दरम्यान शहरातील अनेक बडे व्यापारी अडकणार असल्याचा संशय आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी ममुराबाद परीसरात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर देखिल अचानक धाड टाकण्यात आली असता बडे मासे अलगद सुटून किरकोळ आरोपी मात्र उभे करण्यात आले व सुटले देखिल यावरून पेालिसांच्या कामगीरीवरच एकप्रकारे प्रश्नचिन्ह उभे झाले होते.
जिल्हा भरात अवैध धंद्यांना पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी मज्जाव केला असतांना बाबा प्लाझा मध्ये मात्र खुलेआम पणे बेकायदेशीर पणे कारभार सुरू होता. गेल्या अनेक कार्यवायां मध्ये पोलिसांवरच संशय व्यक्त झाला होता. मात्र बाबा प्लाझा येथे पोलिसांनी बेधडक पणे केलेली कार्यवाही महत्वपूर्ण मानली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.