तितूर नदीतील वाळू तस्करीचे मंत्रालयात पडसाद

0

चाळीसगाव, दि. 23-
तालुक्यातील हिंगोणे येथील तितूर नदी पात्रातील वाळू तस्करी चे पडसाद थेट मंत्रालयात उमटले असल्याचे वृत्त असून महसूल सचिव मनुकूमार श्रीवास्तव यांनी या प्रकरणी गंभीर दखल घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीसांच्या भुमिकेकडे तालुक्याचं लक्ष
हिंगोणे येथील तितूर नदी पात्रातील वाळू तस्करी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल होवून सुध्दा अद्याप एकही आरोपी ला अटक करण्यात आली नाही, अनेक दिवसांपासून लाखो ब्रास चोरलेली गिरणा नदी व तितूर नदी वरील वाळूची रिकव्हरी पोलीस कशी करणार,या एवढ्या मोठ्या वाळू तस्करी मध्ये फक्त माजी नगरसेवकच असू शकतो काय ? असं अनेक सवाल या वाळू तस्करीच्या गुन्हामुळे निर्माण झाले आहे,

हिंगोणेत वाळू चोरट्यांची दहशत
मंगळवारी वाळू चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर बुधवारी काही नागरीकांना दमबाजी, खोटे गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली, यामुळे हिंगोणे गावात दहशत पसरली असून ग्रामस्थांनी बुधवारी तहसीलदार व पोलीस प्रशासनाला कारवाई करण्या बाबत चे निवेदन दिले.वाळू चोरट्या विरूद्ध मोका अंतर्गत कारवाई करा अनथा 1 फेब्रुवारी पासून उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी ज्ञानेश्वर महाजन, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, अरविंद चव्हाण,सयाजी पाटील,आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.