दसनुर येथील उपसरपंचाला मारहाण

0

गुन्हा दाखल करण्यासाठी शंभरावर नागरिक पोलीस ठाण्यात.

रावेर (वार्ताहर) : येथून जवळच असलेल्या दसनुर येथील उपसरपंच सचिल गोविंदा पाटील यांच्यावर डंपर रस्त्यात लावल्याच्या कारणावरून तीन ते चार  जणांनी मारहाण करीत जखमी केले. तसेच मयूर महाजन, चेतन महाजन यांनाही  मारहाण करण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, दसनुर-वाघोदा रस्त्यावर डंपर फसलेले असतांना त्यास जेसीबीने काढणे चालू होते यामुळे रस्ता बंद होऊन शेजारील सचील पाटील यांच्या शेतातून रहदारी सुरू होती त्यात शेतातील हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याने याबाबत संध्याकाळी  ७:००ते ७:३० वाजे दरम्यान डंपरचालका सह  विचारणा केली असता याचा राग येऊन डंपरचालकासह  तीन ते चार  जणांनी  सचिल पाटील   यांना तोंडावर व शरीरावर मारहाण केली.यासह मयूर महाजन ,चेतन महाजन  यांना  मारहाण करण्यात आली. अशी माहिती निंभोरा पोलीस ठाण्यात दिली.सदर जखमी निंभोरा पोलीस ठाण्यात हजर झाल्यावर त्यांना सपोनि महेश जानकर यांनी रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. ही बातमी दसनुर गावात पोहोचल्यावर सर्वांनी पोलीस ठाण्यात १००ते १५० ग्रामस्थांनी धडक देत सदर डंपर चालकांवर व त्याच्या मारहाण करणाऱ्या माणसांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरीत जमाव पोलीस ठाण्याबाहेर ठीय्या देऊन होता.यातील उपसरपंच सचिल पाटील यांना वैद्यकीय तपासणीसाठी व औषधोपचारासाठी रावेर रुग्णालयात  पाठविण्यात आले असून या प्रकरणी १०० ते १२० जणांचा जमाव हजर होता. व रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पुढील तपास सपोनि महेश जानकर यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस कर्मचारी तपास करीत आहे

अवैधरीत्या सुकी नदितील गौन खनिज वाहतूक करणाऱ्या वाळू माफीयांन कळून दसनूर ग्रामपंचायत उपसरपंच यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हि बाब निषेधार्थ असून शासनाने कठोर कारवाई करावी दसनूर मधून अवैधरीत्या वाळू वाहतूक करू देणार नाही.

– . अनिल तायडे, दसनुर

(अरुणा अनिल तायडे सरपंच दसनुर यांचे पती.)

Leave A Reply

Your email address will not be published.