बोदवड येथील नगरसेविकांच्या नातीचा डेंग्यूमुळे मृत्यू !

0

बोदवड (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रं.५ बाहेरपेठ मधील नगरसेविका सशिलाबाई मधूकर गंगतीरे यांच्या चार वर्षीय नातीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दि ४ रोजी घडली. श्रावणी दिलीप गंगतिरे (वय ४ वर्ष) असं या बालिकेचे नाव आहे.

आज दि.४ रोजी सकाळी ही दुःखद घटना घडली असून औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. गेल्या चार दिवसांपुर्वी म्हणजेचं १ जानेवारी रोजी श्रावणी हिचा चौथा वाढदिवस होता.त्यानंतर आज वाढदिवसाच्या चौथ्याच दिवशी या बालिकेवर काळाने झडप घातली.ही दुःखद बातमी कळताच परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.