दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

0

चाळीसगाव :- शहरातील कोदगाव रोडवरील कृष्णराव देशमुख यांच्या घरावर दि २६/६/२०१५ रोजी रात्री शसस्त्र दरोडा पडला होता. त्यात राहुल कृष्णराव देशमुख (२३) याचा खुन करुन ६ लाख ७० हजार रुपये रोख व सोन्याचे दागीने असा १० लाख ३४ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला होता. त्या गुन्ह्यातील ९ पैकी ५ आरोपी अटक झाले तर ४ आरोपी फरार होते. त्यातील रमेश छगन भोसले (रा साईनाथ नगर नागफणी ता नेवासा जि अहमदनगर) या आरोपीस चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुधीर पाटील व पथकाने नाशिक मध्यवर्ती कारागृहातुन ताब्यात घेतले असुन त्याच्याकडुन ईतर फरार आरोपींची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.

नेवासा जि अहमदनगर येथे अशाच प्रकारचा गुन्हा आरोपीने २०१७ मध्ये साथीदारांसह केला होता. त्यात पुर्ण कुटुंबाचा खुन करुन लुट केली होती. त्यावेळी पोउनि सुधीर पाटील हे नेवासा येथे होते व त्यांनी आरोपीस अटक केली होती

व सदर आरोपी हा चाळीसगावच्या गुन्ह्यात फरार असल्याने व गुन्ह्याची पद्धत सारखी असल्याने त्यांनी तपासाची चक्रे फिरवुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरील आरोपीस नाशिक येथुन ताब्यात घेतले आहे त्याच्याकडुन मुद्देमाल व ईतर आरोपी मिळण्याची शक्यता आहे

Leave A Reply

Your email address will not be published.