तळवेल येथील नेहरू विद्या मंदिराच्या पटांगणात वृक्षारोपण

0

भुसावळ (प्रतिनिधी)-  तालुक्यातील तळवेल येथील नेहरू विद्या मंदिराच्या भव्य पटांगणात निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील व शाळेचे पर्यवेक्षक तथा निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळ चे जिल्हा संघटक  एस. एस. अहिरे यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करण्यात आली, यावेळी पर्यावरणाला पूरक असणारी झाडे लावावीत त्यामुळे होणारे प्रदूषण आला आळा बसेल म्हणुन आपण वड, पिंपळ, निब, चिंच, आवळा, आंबा, कांचन, अशी आक्सीजन मोठ्या प्रमाणात निर्माण करणारी झाडे लावावी असे नाना पाटील यांनी मार्गदर्शन करताना सागितले.

जिल्हा संघटक, शाळेचे पर्यवेक्षक  एस. एस. अहिरे  यांनी मोठ्या प्रमाणात देशी झाडांचेच वृक्षारोपण केले असून भविष्यातही निसर्ग व सामाजिक पर्यावरण मंडळाच्या मार्गदर्शनाखाली झाडांचे रोपण करून संवर्धन करू असे यावेळी मनोगतात व्यक्त केले.

या प्रसंगी मार्गदर्शक सुरेंद्र पाटील, शाळेतील शिक्षक व्ही.टी. रोटे, एल. एस. पाटील, व्ही. जे. पाटील, ए. डी. महाजन, सौ. एस. एस. सरोदे ए. पी. कोल्हे यांनी ही वृक्षारोपण करून सहकार्य केले व वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी ही घेतली.

Leave A Reply

Your email address will not be published.